दिघोळ गणातील नवनियुक्त जवानांचा भव्य सन्मान — तालुका चिटणीस मच्छिंद्र गहिनाथ गिते यांचा उपक्रम

दिघोळ गणातील नवनियुक्त जवानांचा भव्य सन्मान — तालुका चिटणीस मच्छिंद्र गहिनाथ गिते यांचा उपक्रम
दिघोळ, ता. जामखेड — भारतीय सेना ही राष्ट्राची अभिमानशक्ती असून, ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत असल्याची सकारात्मक लाट दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस मच्छिंद्र गहिनाथ गिते यांनी दिघोळ गणातील भारतीय सैन्यात नुकतीच भरती झालेल्या सर्व नवयुवकांचा त्यांच्या गावामध्ये जाऊन सन्मान करून त्यांच्या पुढील सेवाजगीचा उत्साह द्विगुणित केला.
या विशेष उपक्रमात वाघा येथील प्रशांत बारस्कर, पिंपळगाव उंडा येथील स्वप्निल खांबे, जातेगाव येथील सत्यम गायकवाड व शुभम गायकवाड, वाकी येथील लक्ष्मण जाधव, धामणगावचे विजय महारनवर, मोहरी येथील कैलास जाधवर,जायभायवाडी येथील नानासाहेब केकाण,तसेच माळेवाडीतील रोहित आवारे आणि भुजंग बनकर या सर्व नवोदित जवानांचा भव्य सन्मान करण्यात आला.
गावोगावी जाऊन प्रत्येक सैनिक तरुणाला सिद्ध संत सिताराम बाबांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या प्रतिमेचे दर्शन व आशीर्वाद घेऊन सेवेची सुरुवात करण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या सन्मानातून ग्रामीण भागातील युवकांनी देशसेवा निवडल्याबद्दल समाजातील ज्येष्ठांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त झाली.
यावेळी सेवानिवृत्त सैनिक नारायण गिते यांनी सर्व नवनियुक्त जवानांना सैन्य जीवनातील शिस्त, जबाबदारी आणि देशसेवेची मूल्ये याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तरुणांचा आत्मविश्वास आणि सेवा भावना आणखी दृढ झाली.
भारतीय सेनेत भरती झालेले हे सर्व युवक आपल्या परिसराचा आणि गावांचा गौरव वाढवत असून, त्यांच्या माध्यमातून दिघोळ गणातील देशभक्तीची परंपरा अधिक बळकट होत आहे. भाजपा तालुका चिटणीस मच्छिंद्र गिते यांनी घेतलेला हा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.



