बीड

जामखेड ITI मध्ये ‘स्किल ऑन व्हील्स’ प्रकल्प सुरू लॅपटॉप, एलईडी स्क्रीनसह डिजिटल ट्रेनिंगचा आरंभ

जामखेड ITI मध्ये ‘स्किल ऑन व्हील्स’ प्रकल्प सुरू

लॅपटॉप, एलईडी स्क्रीनसह डिजिटल ट्रेनिंगचा आरंभ

जामखेड (अहिल्यानगर): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड येथे Infosys Springboard या उपक्रमांतर्गत ‘Skill on Wheels’ प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना लॅपटॉप, एलईडी स्क्रीन यांसारख्या अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये संस्थेतील सर्व व्यवसायांना रोज दीड तासांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, व्हिडिओ बेस्ड लर्निंग, असेसमेंट लर्निंग, सॉफ्टवेअर कोडिंग तसेच Arduino Uno मायक्रो कंट्रोलरच्या मदतीने प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स शिकवले जाणार आहेत.

प्रशिक्षणादरम्यान ट्राफिक कंट्रोल सिस्टीम, ट्राफिक लाईट सिस्टीम, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल सिस्टीम यांसारख्या प्रकल्पांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य सन्माननीय श्री. अजय वाघसाहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे आयएमसी सदस्य श्री. प्रविण उगले, इन्फोसिसचे ट्रेनर श्री. गौरव बोबडे, गटनिदेशक श्री. गजेंद्र जाधव सर, तसेच श्री. तुमेदवार सर, श्री. काळे सर, श्री. सुसे सर, श्री. पिसे सर, श्री. बेंडकोळी सर, श्री. देवडे सर, आणि श्रीमती हरिश्चंद्रे मॅडम व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Back to top button