बीड

भगवंत उदार अंतःकरणाचा आहे – ह.भ.प. राजेन महाराज भोसले

भगवंत उदार अंतःकरणाचा आहे – ह.भ.प. राजेन महाराज भोसले
बीड| प्रतिनिधी :
नांदूर फाटा जवळील खर्डेवाडी येथे दि. ५ मार्च २०२६ रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज  बीज उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ व त्रिदिनी कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यानिमित्त ह.भ.प. राजन महाराज भोसले यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.
आपल्या कीर्तन सेवेत त्यांनी प्रतिपादन केले की, भगवंत हा उदार अंतःकरणाचा असून तो आपल्या भक्तांचे रक्षण करतो, त्यांना सांभाळतो आणि त्यांच्या जीवनातील अनिष्ट दूर करून शेवटी मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो.
श्रीमद् भागवत कथा संपन्न
खर्डेवाडी येथे ह भ प भागवत कथा प्रवक्ते रामचंद्र महाराज जगताप यांच्या संगीत श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यां  सात दिवसांत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तीने भागवत कथा श्रवण केली. या बीज उत्सवानिमित्त  त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले. या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. श्रीनिवास महाराज जगताप, ह भ प नारायण महाराज शिरसट तसेच ह.भ.प. डॉ. केशवदास महाराज वैष्णव यांची हरिकीर्तन सेवा संपन्न झाली.
हरिपाठ
या बीज उत्सवानिमित्त व श्रीमद संगीत भागवत कथा , किर्तन महोत्सव आणि दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत खर्डेवाडी भजनी मंडळाचा संगीत हरिपाठ नित्यनेमाने मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला या हरीपाठासाठी गावातील बहुसंख्येने भाविक उपस्थिती लावून आनंद घेतला. त्या,बरोबरच फुगड्याचा
ही आनंद भावीकभक्तांनी घेतला
“जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या घरी”
या उपक्रमांतर्गत ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचे अभ्यासक ह भ प हरिदास सोळंके महाराज गुरुजी ,यांच्या मार्गदर्शनाखाली या भागवत कथेमध्ये साधकांना तुकाराम महाराज गाथा ग्रंथ भेट देण्यात आले.
या सोहळ्यानिमित्त कळेकर परिवारांनी आयोजित केलेल्या श्रीमंत संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात किसन बाबा कळेकर याची पुण्यतीथी, रत्नदीप कळेकर यांचे पुण्यस्मरणही साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. वृंदावनी महादेव साळुंके, प्रशांत कळेकर व कळेकर  परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास  समस्त ग्रामस्थ खर्डेवाडी, धावज्याचीवाडी, पांढरेची वाडी, तांदळवाडी, यांचे मोलाचे योगदान लाभले सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला
केज, बीड, कवडगाव, नांदूर, खरडेवाडी, धावजेवाडी, येळंब, वांगी,परळी,व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. शेवटी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Back to top button