बीड

किसान अर्बनच्या वतीने शेतकऱ्यांना  शेतीचा ताळेबंद हिशोब पुस्तिकेचे मोफत वाटप

किसान अर्बनच्या वतीने शेतकऱ्यांना  शेतीचा ताळेबंद हिशोब पुस्तिकेचे मोफत वाटप
 शेतकऱ्यांसाठी महेश बेदरेचा अभिनव उपक्रम 5000 पुस्तक प्रतीचे सलग दुसऱ्या वर्षीही वाटप
 गेवराई (प्रतिनिधी ) शेतकरी हा केंद्रबिंदू मानून  गेल्या वीस वर्षापासून शेती विषयात अविरत कार्य करणारे कृषी भूषण  महेश गणेशराव बेदरे यांनी शेतकऱ्यांना  शेतीतील वार्षिक पिकाचा हिशोब लिहिण्यासाठी शेतीचा ताळेबंद या पुस्तकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  वर्षभरातील पिकाची  शेतीतील दैनंदिन खर्चाची टिपणी लिहिण्यासाठी  शेतीचा ताळेबंद पुस्तिका  किसान अर्बन च्या द्वितीय  वर्धापन निमित्त  5 हजार प्रति पुस्तिकेचे  मोफत वाटप करून वर्धापन दिन उत्साहात साजरा
 करण्यात आला आहे
 सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तथा गेवराई तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करणारे  महेश बेदरे यांनी 17 वर्षापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून  नव तंत्रज्ञान देऊन शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवतात गत पाच वर्षापासून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाबरोबरच गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची अडचण दूर करण्यासाठी  जिल्हा बाहेरील कारखान्यांना ऊस पुरवठा करून जिव्हाळ्याचे नाते तयार केले आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी किसान अर्बन  को – ऑफ क्रेडिट  सोसायटीची स्थापना करून सहकार क्षेत्रात अर्थक्रांतीमध्येही आपला ठसा उमटवलेला आहे गेल्या दोन वर्षांमध्ये दोनशे कोटीची उलाढाल  करून  किसान अर्बन  ने ही आपले नाव गेवराई तालुक्यात कोरवले आहे संस्थेचे चेअरमन महेश बेदरे यांच्या माध्यमातून विश्वासाच्या जोरावर सध्याच्या बँकिंग क्षेत्रातील  पडझडीमध्येही  शेतकऱ्यांमध्ये किसान अर्बन  ने आपले नाव कोरविले आहे   किसान अर्बनच्या  द्वितीय  वर्धपान दिना निमित्त  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेतीचा ताळेबंद या पुस्तकाचे वितरण करण्यात आले गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना  गेल्या वर्षीपासून  या अभिनव उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च लिहिण्याचा छंद या शेतीच्या ताळेबंद लागला आहे  गतवर्षी शेतकऱ्यांनी या पुस्तिकेचा  वापर करून अचूकपणे शेतीतील उत्पन्ना  मध्ये नफा काढून शेतीतील पीक प्रणाली बदलण्याच्या दृष्टिकोनातून  मोठा बदल घडत आहे शेतकऱ्यांना शेतीतील नांगरट, विविध मजूर खर्च, बियाण्याचा खर्च, खतांचा खर्च, वाहतुकीचा खर्च, अंतर मशागतीचा खर्च, फवारणीचा खर्च, व मिळणारे उत्पादन याचा अचूक खर्च लिहिण्यासाठी ही पुस्तिका शेतकऱ्यांसाठी  ही पुस्तिका दिशादर्शक ठरली आहे  व शेतीतीत बदल करण्यासाठी शेतकरी नक्कीच पुढाकार घेत असून शेतकऱ्यात नक्कीच बदल घडेल असा विश्वास महेश बेदरे यांनी व्यक्त केला.

Back to top button