📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

परळीतील ऐतिहासिक दर्गा नासरजंग इनाम जमीन प्रकरणी कारवाईची मागणी

परळीतील ऐतिहासिक दर्गा नासरजंग इनाम जमीन प्रकरणी कारवाईची मागणी
*सय्यद सलीम बापू यांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत आंदोलनाचा इशारा*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) — येथील ऐतिहासिक दर्गा नासरजंग इनाम जमीन प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सय्यद सलीम बापू यांनी दिला आहे.
            प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, दर्गा नासरजंगच्या इनाम जमिनीतील सर्व्हे क्रमांक ३६, ३७, ३८, ४१, ४२, ३६/१ व ३६/३ या मिळून सुमारे १७८ एकर जमिनीबाबत कथितरीत्या बोगस कागदपत्रांच्या आधारे पी.टी.आर., पी.आर. कार्ड व सातबारा तयार करण्यात आले.स्थानिक भूमाफियांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने देवस्थान इनाम जमिनीची विल्हेवाट लावण्याचा प्रकार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
         या प्रकरणात नगर परिषद परळीचे मुख्याधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक तसेच इतर संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. परळी तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी साहेब यांचा कसलाही अंकुश राहिला नसून ते म्हणेन तोच कायदा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
           वरील प्रकरणात अनेक वेळा निवेदने देऊनही चौकशी होत नसल्याची खंत व्यक्त करत, जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील प्रकरणात जातीने लक्ष देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.तसेच धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई मुंडे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा,अशी मागणीही करण्यात आली आहे.
        तरी ऐतिहासिक दर्गा नासरजंग इनाम जमीन प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत,अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल,असे सय्यद सलीम बापू यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
Back to top button