बीड

सार्वजनिक शिवजयंती उत्सव लिंबागणेश अध्यक्षपदी डॉ . गणेश ढवळे! उपाध्यक्षपदी रविंद्र निर्मळ

सार्वजनिक शिवजयंती उत्सव लिंबागणेश अध्यक्षपदी डॉ . गणेश ढवळे! उपाध्यक्षपदी रविंद्र निर्मळ

लिंबागणेश:- (दि.१९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि. १९ फेब्रुवारी गुरुवार  रोजी  सरपंच बालासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, माजी उपसरपंच शंकर वाणी,ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात , अर्जुन घोलप, रमेश गायकवाड,अक्षय वाणी,शेख समीर , अशोक जाधव यांच्या उपस्थितीत  प्रतिवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२६ गठीत करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित समितीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ . गणेश ढवळे उपाध्यक्ष सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, सचिव अँड.गणेश वाणी, कोषाध्यक्ष नितीन जाधव , सल्लागारपदी राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, बाळकृष्ण थोरात,भगवान मोरे,गणपत तागड, संजय घोलप,यांची तर सदस्यपदी विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ,दादा गायकवाड,हरिओम क्षीरसागर,संजय पावले,तुकाराम गायकवाड, औदुंबर नाईकवाडे,महावीर वाणी, अभिजित गायकवाड, महावीर जाधव, ,बाबु शिंदे, ओंकार तागड, विक्की भोसले,अक्षय येडे,  ढवळे, विजय आगवान,अमर आबदार, स्वप्निल वक्ते यांची निवड करण्यात आली.प्रास्ताविकात अशोक वाणी यांनी मागील संपूर्ण वर्षभरात शिवजयंती उत्सव समितीकडुन झालेल्या कार्यक्रमांची संक्षिप्त स्वरूपात माहिती देत शिवजयंती उत्सवाची रूपरेषा आणि उत्सवाला अभिप्रेत असणा-या बाबी मांडल्या. डॉ.गणेश ढवळे यांनी गतवर्षी प्रमाणेच डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करत आदर्शवत शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामपंचायत्या वतीने अध्यक्षपदी निवड झालेले डॉ . गणेश ढवळे , उपाध्यक्ष रविंद्र निर्मळ, सचिव अँड.गणेश वाणी, सल्लागार संतोष भोसले व ईतर पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांकडून निवडीचे स्वागत करण्यात आले.

Back to top button