
यशस्वी होण्यासाठी जिद्द महत्त्वाची-रणवीर पंडित
*शिवाजीनगर बी. फार्मसी महाविद्यालयात फ्रेशर्स दिन आनंदात साजरा*
गेवराई दि.१४(प्रतिनिधी) कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे, मनात जिद्द ठेऊन वाटचाल केली तर यश आपल्याकडे येते, तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द ठेऊन वाटचाल करावी व यशस्वी व्हावे असे आवाहन शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. शिवाजीनगर गढी येथील कॉलेज ऑफ बी. फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे विद्यार्थ्यांकरिता फ्रेशर्स दिन आयोजित करण्यात आला होता, यांवेळी ते बोलत होते.
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ बी. फार्मसी अँड रिसर्च सेंटर, शिवाजी नगर, गढी. येथे प्रथम वर्ष विद्यार्थ्याकरिता द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, बाजार समितीचे उपसभापती श्रीराम पवार, शिवशारदा पब्लिक स्कूलचे प्राचार्य संतोष कुमार अन्नम. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वर्तमान काळातील शिक्षण क्षेत्रात असलेल्या स्पर्धेचा आणि त्याकरता आवश्यक असलेली जिद्द आत्मसात करून सामोरे जावे, तसेच आज दैनंदिन शिक्षणासह उत्तम आरोग्यासाठी खेळातही सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. राख एम.एस., प्रा. बदरे ए.ए., प्रा.देशमुख आर.बी., प्रा.शेख एम.आय., प्रा.गोयकर एम.बी., प्रा.धुमाळ एम.डी., प्रा.देशमुख एस.व्ही, प्रा.गायकवाड व्ही.एस., प्रा.गायकवाड वाय.एम. यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी पवार एस.जी., मोटे जी.आर., शिंदे आर.आर., शिंदे आर.आर., नाटकर आर.ई.,माने वाय.डी., काळे ए.एस., पवार पी.आर., शिंदे पी.बी., मडिकर ओ.एस. यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



