बीड

विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे विवेकानंद शाळेच्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्रा.डॉ.पंडीत तुपे यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
विवेकानंद शाळेच्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्रा.डॉ.पंडीत तुपे यांचे प्रतिपादन
बीड (प्रतिनिधी)-बीड शहरातील विवेकानंद विद्यालय, धानोरा रोड बीड येथे 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जगताप सर होते तर प्रमुख पाहुणे प्रा.श्रीमंत बिराजदार होते या वेळी बोलतांना प्रा.डॉ.पंडीत तुपे यांनी जिवनात यशस्वी होण्यासाठी निश्चत बरोबर आत्मविश्वास पाहिजे असे यावेळी म्हणाले.  प्रा.विकास जाधव, गिरी सर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प्रा.डॉ.पंडीत तुपे म्हणाले की 10 वी हा जीवनाचा अत्यंत टर्निंग पाँईट आहे. यापुढे करिअरच्या अनेक संधी, शाखा आहेत या नवआधुनिक युगात, पालक व विद्यार्थी गोंधळलेला आहे. यशस्वी होण्यासाठी ध्येय, मार्गदर्शन, मेहनत, सातत्यता, आत्मविश्वास पाहिजे त्यांनी अब्राहम लिंकन अलेक्झांडर यांचे उदाहरण दिले.
यावेळी प्रा.श्रीमंत बिराजदार, विकास जाधव यांनी मार्गदर्शन केले. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय समारोप केला.
Back to top button