रायगड

मुंबई गोवा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा पोलादपूर मधील वैभव पालकर वरती काळाचा घाला

 

प्रसिध्दी प्रमुख – लवेश साळवी

मुंबई गोवा मार्गावरती अपघाताची मालिका सुरूच असून रविवारी सकाळच्या वेळेस दुर्दैवी अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 3 तारखेस घडली आहे. महाड एमआयडीसीतून रात्रपाळी करून सकाळी 7.30 वा. सुमारास पोलादपूरच्या दिशेने जात असताना लोहारे येथील पेट्रोल पंपा समोर एका अज्ञात आयशर ट्रकने ऍक्टिवा क्रमांक MH06BR4627 या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी वरील वैभव रमेश पालकर उर्फ राजू पालकर रा. आनंद नगर पोलादपूर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक प्रमोद कदम रा.भोगाव पोलादपूर हे गंभीर जखमी झाले असून; अपघातानंतर जखमी प्रमोद कदम यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर, पोलीस हवालदार रवींद्र सरनेकर, पोलीस हवालदार तुषार सुतार यांनी घटनास्थळी गाव घेतली. अपघातास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात ट्रकचा शोध पोलादपूर पोलिसांकडून सुरू असून पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button