रायगड

तळ्यामध्ये शेकडो आदिवासी बांधवांच्या हाती शिवसेनेचा भगवा

तळा सूर्योदय विशेष प्रतिनिधी कृष्णा भोसले.

तळा तालुका शिवसेनेच्या वतीने राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभुमी विकासमंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या ढालकाठी येथील निवासस्थानी आदिवासी बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ना.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील अनेक आदिवासी समाज बांधवांसह तळा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष अनिल नवगणे,उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे,जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके,जिल्हा कोअर कमेटी सदस्य लिलाधर खातू,तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके,शिवसेना नेते कैलास पायगुडे,नितिन‌ साळवी,लता मुंढे, रघुनाथ वाघरे,दिपक चिंचळकर, आदिवासी बांधव‌ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी बांधवांना त्यांचे मुलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम प्रयत्नशिल राहिल. आदिवासींना वनहक्क मिळवून देण्यासह आदिवासींच्या उत्कर्षासाठी कायम कटिबध्द राहणार असुन आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास शिवसेना कायम कटिबध्द राहणार असल्याची शाश्वती ना. गोगावले यांनी दिली.आदिवासी बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार),उबाठा पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेची भगवी शाल घालून जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी शिंदे शिवसेनेत स्वागत केले.तळा तालुक्यात वाड्या वस्तीवर यापुढे शिवसेनेचा धनुष्यबाण फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी बोरघर आदिवासी वाडी,महागाव आदिवासी वाडी,महुरे,बहुलेवाडी, बारपे,रहाटाड गाव,रहाटाड बौध्दवाडी, रहाटाड मोहल्ला, तळा शहरातील रोहिदास नगर, मोहल्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार),उबाठा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकासमंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

महायुतीत रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून सध्या जोरदार संघर्ष सुरू असताना ना.गोगावले यांनी तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील आदिवासी बांधव आणि इतर गावातील कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश घेऊन श्रीवर्धन मतदार संघातील तटकरे कुटुंबाच्या प्रभावाला आवाहन उभे करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ना.गोगावले आणि खा.तटकरेंमध्ये येणाऱ्या काळात मोठा संघर्ष पहावयास मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button