📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा:- नवनाथ बाबा 

आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा:- नवनाथ बाबा
बाबूनाईक तांडा येथे काल्याचे किर्तन संपन्न
बीड (प्रतिनिधी) आई-वडील हे पृथ्वी वरील परमात्म्याचे रूप आहे मनुष्याने आयुष्यात आई-वडिलांची सेवा करावी आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आई वडील हेच पृथ्वीतलावरील जिवंत तीर्थक्षेत्र आहे म्हणून मनुष्याने आई-वडिलांची सेवा करावी असे गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी बाबु नाईक तांडा येथे संत सेवालाल महाराज ग्रंथ सप्ताह सांगते वेळी काल्याच्या कीर्तनात अभंग विवेचनांमध्ये भाव व्यक्त केला
     संत सेवालाल महाराज यांचे ग्रंथ वाचन सांगते वेळी गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे काल्याच्या कीर्तनाचे आयोजन बाबूनाईक तांडा ढेकणमोह येथे आयोजित करण्यात आले होते. अभंग विवेचनामध्ये शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज पुढे म्हणाले की परमात्मा हा साधुसंतांची सेवा केली की खुश होतो व संसारातील दुःख कमी करून मनुष्याला सुखी बनवण्याचे काम आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे
    संसारी मनुष्याने आयुष्यामध्ये फक्त संपत्तीच्या मागे न लागता आपल्याला लहानाचं मोठं  करणाऱ्या आई-वडिलांची व जगाचे कल्याण करणाऱ्या साधुसंतांची सेवा करावी आई वडील व साधुसंतांच्या सेवेत सर्वात मोठे तीर्थ आहे संसारी जीवाने आयुष्य व्यतीत करत असताना आई-वडिलांची सेवा करावी असे अभंग विवेचनामध्ये गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी केले.
      बाबू नाईक तांडा येथे संत सेवालाल महाराज ग्रंथ सांगतेवेळी काल्याच्या कीर्तनास टाळकरी माळकरी भजनी मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादात चे आयोजन बाबू नाईक तांडा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले
Back to top button