बीड

सेवानिवृत्ती विभागात कर्मचारी नियुक्त करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!

सेवानिवृत्ती विभागात कर्मचारी नियुक्त करावा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!

एक महिन्या पासून माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त विभागात कर्मचारी नाही; शेकडो प्रस्ताव प्रलंबित!
मराठवाडा शिक्षक संघ तीव्र आंदोलन करणार!
बीड : सेवानिवृत्ती प्रस्ताव नागपूरला पाठविण्यासाठी व मंजूर होवून आलेले प्रस्तावावर पुढील कार्यवाहीसाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्ती विभागात कर्मचारी नियुक्ती करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
        याबाबत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एक महिन्या पासून माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्ती प्रस्ताव स्वीकारण्यासाठी कर्मचारी नाही. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती प्रस्ताव खोळंबून पडले आहेत. ज्यांचे सेवानिवृत्ती प्रस्ताव नागपूरहून मंजूर होवून आले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती वेतना बाबत पुढील कार्यवाही प्रलंबित असल्याने ते सेवानिवृत्ती वेतना पासून वंचित आहेत. याबाबत मराठवाडा शिक्षक संघाने कर्मचारी नियुक्तीची मागणी 21 जानेवारी 2025 रोजी मा मुख्यकार्यकारी अधिकारी जि प बीड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या व भावी काळात सेवानिवृत्त होणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधे प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्ती विभागात ताबडतोब कर्मचारी नियुक्त करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए. बी., माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दिनकर शिंदे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण, हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके, सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे, बी. टी. खाडे यांनी मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचेकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
Back to top button