एकलव्य बालसंस्कार केंद्र व तक्षशिला प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

एकलव्य बालसंस्कार केंद्र व तक्षशिला प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
अष्टपैलू आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांचे ध्येय- नगरसेवक अमित चिंतामणी
जामखेड प्रतिनिधी:-अष्टपैलू आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांचे ध्येय आहे. यासाठी शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत, पालकही त्यांना सहकार्य करत आहेत, यामुळेच शाळेचा शैक्षणिक तसेच सांस्कृतिक दर्जा उंचावत आहे.असे प्रतिपादन नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले. ते तक्षशिला प्रायमरी स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
एकलव्य बालसंस्कार केंद्र (बालवाडी) व तक्षशिला प्रायमरी स्कूल जामखेड या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २२ /०३/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा चे जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात हे होते तर उद्घाटक काँग्रेसचे राहुल उगले हे होते. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी संधी खूप प्रेरणादायी ठरते,अशा कार्यक्रमांमधून त्यांचा आत्मविश्वास वाढतो व कलागुणांना वाव मिळतो
यावेळी बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले,शहाजीराजे भोसले ( तालुका अध्यक्ष – काँग्रेस पार्टी),नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक दिगंबर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक शिंदे,प्रसिद्ध कलाशिक्षक तात्यासाहेब फुले, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,माजी संचालक सागर सदाफुले,भाजपा नेते संजय काशिद, कॅप्टन लक्ष्मण भोरे, विनायक राऊत, विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते, लेखक एकनाथ चव्हाण,मनोहर इनामदार, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार,पोलीस नाईक अविनाश ढेरे, काॅन्स्टेबल सचिन देवढे ,काॅन्स्टेबल देविदास पळसे, काॅन्स्टेबल सतिष शिंदे,लक्ष्मण रसाळ, संतोष गव्हाळे,अविनाश साळुंके, योगेश पोपळे,
पाडुरंग म्हेत्रे,वाकळे सर , मारुती सराफ ,श्रेयश कदम ,किरण म्हेत्रे, किरण विधाते ,सागर राऊत ,अविनाश क्षिरसागर , योगेश पोपळे, विनोद हुंबे, संदिप कचरे आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी आणि लघुनाट्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तक्षशिला प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक अशोक जावळे, अशोक आजबे (अध्यक्ष – संत सावतामाळी बहुउद्देशीय संस्था) अविनाश जावळे ( संचालक – संत सावतामाळी बहुउद्देशीय संस्था), उपाध्यक्ष – प्रल्हाद जावळे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत निकम (महाराज) यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक जावळे यांनी मानले.



