बीड
ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते परळीच्या विविध भागात दुर्गोत्सव मंडळातर्फे आरती ; भक्तांची मोठी गर्दी अन् प्रचंड उत्साह


परळी दि. १८ —–राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज नवरात्रोत्सव निमित्त शहराच्या विविध भागात दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने देवीची आरती करण्यात आली. भक्तांचा मोठा उत्साह आणि गर्दी यावेळी उसळली होती.
शहरातील सुभाष चौक, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर भागात तुळजाभवानी, शिवाजीनगर दुर्गोत्सव, छत्रपती शिवाजीनगर, विद्यानगर दुर्गोत्सव, तेली समाज दांडिया उत्सव शनिमंदिर आदी विविध ठिकाणी ना. पंकजाताई मुंडे यांच्या आरत्या करण्यात आल्या. सर्व प्रभागात त्यांची नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
••••