📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नारायणगड, भगवान भक्तीगडावर डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतले दर्शन

नारायणगड, भगवान भक्तीगडावर डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतले दर्शन
दसरा मेळाव्यानिमित्त श्रद्धास्थळांना भेट देत संत-महंतांचे घेतले आशीर्वाद
बीड (प्रतिनिधी)
दि.२० : विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगड (धाकटी पंढरी) आणि पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भेट देऊन मंगळवारी (दि.२०) दर्शन घेतले. विजयादशमीच्या निमित्ताने या दोन्ही गडांवर दर्शन घेऊन संत-महंतांचे आशीर्वाद घेत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी धार्मिक परंपरा जपली.
श्री क्षेत्र नारायणगड येथे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराजांच्या हस्ते डॉ.क्षीरसागर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर डॉ.क्षीरसागर यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर जाऊन संत भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायणगड व भगवान भक्तीगड ही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचे ते केंद्र आहेत. या दोन्ही पवित्र श्रद्धास्थळांवर नतमस्तक होत डॉ.क्षीरसागर यांनी संत -महंतांचे आशीर्वाद घेतले.
चौकट
स्नेहमिलन उत्साहात
विजयादशमीच्या मंगलमय पर्वानिमित्त भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित दसरा स्नेह मिलन सौ.के.एस.के. महाविद्यालयात उत्साहात पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या शुभपर्वावर सर्वांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Back to top button