अंबाजोगाईत 2,3 व 4 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन

अंबाजोगाईत 2,3 व 4 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन
*कला महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार – स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख व पत्रकार सतीश मोरे यांची माहिती*
*राज्यस्तरीय कला महोत्सवात समुह भजन, आराधी गायन, वैयक्तिक नृत्य व समुह नृत्य स्पर्धेची जय्यत तयारी*
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बालाजी देशमुख;
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरू झालेल्या अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलेच्या सांप्रदायिक धार्मिक सांस्कृतिक कलेचा स्पर्धेच्या माध्यमातून नामवंत कलावंताच्या अविष्कार पहावयास मिळणार आहे. यानिमित्ताने 2, 3, 4 सप्टेंबर 2026 या दरम्यान लोकसभागातून राज्यस्तरीय कला महोत्सव – अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल व डिजिटल मीडिया महाराष्ट्रच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कला महोत्सवात समुह भजन, आराधी गायन, वैयक्तिक नृत्य व समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय कला महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती देवून अंबाजोगाई दर्शन, डिजिटल मिडिया महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कला महोत्सवात बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि पत्रकार सतीश मोरे यांनी पत्रकार कक्ष येथे आयोजित पत्रपरिषदेत केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि पत्रकार सतीश मोरे यांनी सांगितले की, हा कला महोत्सव दिनांक 2, 3, 4 सप्टेंबर 2026 रोजी दररोज सकाळी 9 वाजल्यापासून श्री मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृह, न.प.अंबाजोगाई (जि. बीड) येथे होणार आहे. या महोत्सवात एकूण 4 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समूह भजन स्पर्धा (पारंपारिक भजन, गवळण, भारूड), आराधी गायन स्पर्धा, समूह वैयक्तिक नृत्य स्पर्धा, पारंपारिक समूह नृत्य लोककला स्पर्धा. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सर्वांनाच सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ~ 5,000/- रूपये., द्वितीय पारितोषिक ~ 4,000/- रूपये, तृतीय पारितोषिक ~ 3,000/- रूपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ~ 1,000/- रूपये 2 बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नोंदणी शुल्क 500/- रूपये एवढे आहे. ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांवनोंदणीची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2026 आहे. इच्छुक स्पर्धकांनी व संघांनी नांव नोंदणीसाठी थेट आयोजक संपर्क : 9422244170 /9422130585,
ह.भ.प.अमोल महाराज घोडके – (9175439777), अर्चनाताई शेटे – (8080507151), प्रशांत (बबलू) जाधव – (9850686298), सतीश मोरे (9422244170), अश्विनी लोमटे यादव (9422130585) यांच्याशी संपर्क साधावा. दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता समूह भजन स्पर्धा, आराधी गायन स्पर्धा होणार आहेत. तर दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता समूह पारंपारिक नृत्य स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा होणार त्यानंतर चारही स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येईल. प्रत्येक समूहात किमान 10 सदस्य असणे आवश्यक. भजन स्पर्धेसाठी पेटी, तबला, ताल मृदंगाची व्यवस्था संयोजन समिती करेल. प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. या महोत्सवामुळे अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठे व्यासपीठ मिळणार आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीड जिल्हाभरातील कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलचे संपादक सतीश मोरे, उपसंपादक अश्विनी लोमटे यादव, डिजिटल मीडिया परिषदचे अध्यक्ष अभिजीत लोमटे, उपाध्यक्ष संजय जोगदंड, श्रीराम यादव, आरेफभाई सिद्दिकी, गजानन वांगीकर चौधरी, नागेश औताडे, अमोल माने, सचिन मोरे, जहांगीरभाई इनामदार, अनिरूद्ध पांचाळ, बालाजी देशमुख, मनोज कोकणे, योगेश डाके यांनी केले आहे.



