बीड
श्रीरामभक्त श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त संगीतमय सुंदरकांड चेआयोजन.

श्रीरामभक्त श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त संगीतमय सुंदरकांड चेआयोजन.
बीड :- (प्रतिनिधी सुरेश साळुंके ) श्री युवा माहेश्वरी सेवाभावी संस्था बीडने दि. २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता श्रीरामभक्त श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त बीडच्या अध्यात्मिक क्षेत्रात भर टाकणाऱ्या संगीतमय सुंदरकाण्डाचे आयोजन केले आहे.गेली अनेक वर्षापासून विविध जयंती उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त संगीतमय सुंदरकाण्डाचे आयोजन करणाऱ्या श्री युवा माहेश्वरी सेवाभावी संस्थेच्यावतीने श्रीरामभक्त श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री बजरंगी सुंदरकाण्ड मंडळ बोरी जिल्हा परभणीचे संगीतमय सुंदर काण्डाचे आयोजन केले आहे.दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता संपन्न होणाऱ्या संगीतकाण्डामध्ये भाविक बंधू आणि भगिनींनी सुंदरकाण्डाचे पठण करण्यासाठी सुंदरकाण्डाची पुस्तिका घेऊन मॉ वैष्णोदेवी मंदिर प्रांगण विप्रनगर बीड येथे उपस्थित राहून संगीतमय सुंदरकाण्ड भक्तीचा आनंद घ्यावा असे आवाहन सुंदरकाण्डाचे मुख्य यजमान श्री चंद्रप्रकाश सेठी, गजानन चरखा,अमर नाईकवाडे,संतोष सोहनी,सुमित भराडीया,तहसील माहेश्वरी सभेचे अध्यक्ष पंकज धूत सचिव अमर सारडा यांच्या सह युवा माहेश्वरीचे अध्यक्ष राजेश्वर तापडिया, विजय डागा, आकाश चरखा, संकेत तापडिया, गोपाल लद्दड, अजय डागा, आशिष कासट, युवराज चरखा आणि वैष्णोदेवी मंदिर संस्थान, रामदेव बाबा मंदिर संस्थान, वरद गणेश मंदिर संस्थान, संतोषी माता मंदिर संस्थान, दक्षिणमुखी हनुमान मंदिर संस्थान, बालाजी मंदिर संस्थान, लक्ष्मीनारायण संस्थान, श्री विठ्ठल मंदिर संस्थान बीड यांनी केले आहे.



