चैत्र पौर्णिमेनिमित्त शिवणी येथे धम्मदेसना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

चैत्र पौर्णिमेनिमित्त शिवणी येथे धम्मदेसना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन
बीड (प्रतिनिधी)ः- प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडच्या वतीने प्रति महिन्याप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी ता.जि.बीड येथे गुरुवार दिनांक 02 एप्रिल 2023 रोजी धम्मदेसना, खिरदान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मौजे शिवणी येथील डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर येथे पु.भिक्खु धम्मशील थेरो (हिंगोली/बीड) व पु.भन्ते बुध्दबोधी (शिवणी) हे धम्मदेसना देणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता बोधी वृक्षाची वंदना होऊन सकाळी 10.30 ते 12 या दरम्यान खिरदान व भोजदान तर दुपारी 12 वाजता त्रिसरण-पंचशील-बुध्दवंदना होणार असून त्यानंतर दुपारी 12.30 वा. पाहुण्यांचा सत्कार व मार्गदर्शन व दुपारी 1 वाजता धम्मदेसना व त्यानंतर कालकथीत ज्ञानोबा पंडीत यांच्या स्मरणार्थ पदमीनबाई ज्ञानोबा पंडीत यांच्यावतीने सर्वांना खिरदान देण्यात येणार असून सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडचे सचिव पु.भिक्खु धम्मशील थेरो, संस्थेचे पदाधिकारी व शिवणी येथील बौध्द उपासक-उपासिका यांनी केले आहे.


