खर्डा येथे गुरु-शिष्य जयंतीनिमित्त भटके-विमुक्त समाजात प्रबोधन मेळावा

खर्डा येथे गुरु-शिष्य जयंतीनिमित्त भटके-विमुक्त समाजात प्रबोधन मेळावा
( जामखेड- प्रतिनिधी) | १४ एप्रिल – छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या वतीने प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक विजय झंजाड होते. अॅड. डॉ. अरुण जाधव, प्रवीण रणबागुल, विजयसिंह गोलेकर , बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, विशाल पवार,साहित्यिक गोकुळ गायकवाड, डॉ. सोपान गोपाळघरे, डॉ बिपिनचंद्र लाड, शाहिर बाळासाहेब , भिमराव सुरवसे,मच्छिंद्र जाधव,शहानुर काळे ,फकीर मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी,तसेच निता इंगळे, उर्मिला कवडे,निशा शिंगाणे,मंगल शिंगाणे,रेश्मा बागवान ,शोभा ठोकळे, सुनिता कांबळे, रुकसाना मापाडी आदी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी समाजप्रबोधन व शिक्षणावर भर देत मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके-विमुक्त संसाधन केंद्राच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला.



