बीड
चिंचवन येथे पहिल्या महिला पोलीस पाटीलपदी नीताताई मात्रे यांची निवड

चिंचवन येथे पहिल्या महिला पोलीस पाटीलपदी नीताताई मात्रे यांची निवड
चिंचवन (प्रतिनिधी) : चिंचवन गावाच्या इतिहासात प्रथमच महिला पोलीस पाटील म्हणून सौ. नीताताई श्रीराम मात्रे यांची निवड झाली असून, ही गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या निवडीमुळे चिंचवन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झाल्यानंतर बीड येथील त्यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना आचार्य चाणक्य यांचे सन्मानचिन्ह प्रदान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नीताताई मात्रे या सुशिक्षित व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी यापूर्वी विविध सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांची सर्वसामान्य नागरिकांशी घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम करत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या अनुभवाचा व कार्यतत्परतेचा लाभ चिंचवन गावाच्या विकासासाठी निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी हे पद मिळविल्यामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
या प्रसंगी प्रा. नेटके सर, युवा नेते ईश्वरजी तांबडे, पत्रकार हनुमंत मात्रे, संदीप पाटील शिंदे, नवनाथ मात्रे सर, प्रा. शिवाजीराव कोठुळे, प्रा. बब्रुवाना नखाते, श्रीराम मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.



