बीड
राज्यस्तरीय प्रश्नमंजूषेत आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ठसा

—
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने आणि अभ्यासपूर्ण तयारीने उंचावला महाविद्यालयाचा नावलौकिक
प्रतिनिधी | बीड
आदित्य आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आयुर्वेद प्रश्नमंजूषेमध्ये घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेला उजाळा दिला. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय व श्री एकनाथ आयुर्वेद रुग्णालय, शेवगाव तसेच आयुर्वेद व्यासपीठ शाखा, अहिल्या नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी शेवगाव येथे ही राज्यस्तरीय आयुर्वेद प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत राज्यभरातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांतील बी.ए.एम.एस. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या आणि अभ्यासपूर्ण झालेल्या या स्पर्धेत आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र पातळीवर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बी.ए.एम.एस. ची विद्यार्थिनी किरण जगताप हिने सर्वोत्कृष्ट स्पर्धकाचा मान पटकावला.
या स्पर्धेसाठी आदित्य आयुर्वेद महाविद्यालया कडून तीन संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील प्रत्येकी एक विद्यार्थी सहभागी होता. आयुर्वेदाच्या विविध संहितांवर आधारित प्रश्नसंच तयार करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मागील तीन महिन्यांपासून सातत्यपूर्ण आणि कठोर परिश्रम घेतले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य विवेक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळाली.
या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थांचे विशेष अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या सभागृहात विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य वैद्य विवेक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, अभ्यासात सातत्य ठेवले तर दृष्टी व्यापक होते आणि ज्ञानाला नवे आयाम प्राप्त होतात, असे गौरवोद्गार काढले. राज्यस्तरीय यशामुळे आदित्य आयुर्वेद महाविद्यालय, बीडने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे.
———
डॉ. आदिती सारडा यांच्याकडून विद्यार्थांचे कौतूक
राज्यस्तरीय आयुर्वेद प्रश्नमंजूषेमध्ये आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे मत संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची, शिस्तबद्ध तयारीची आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची ही फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे ध्येय निश्चित ठेवून गुणवत्ता, आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर वाटचाल केल्यास भविष्यातही मोठी यशस्वी कामगिरी घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.