बीड

जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित हुकुमशाही : अँड श्रीनिवास बेदरे

जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित हुकुमशाही : अँड श्रीनिवास बेदरे
गेवराई ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ (विधानसभा विधेयक क्रमांक ३३) हे महाराष्ट्रातील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करणारे विधेयक आहे असे मत बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांनी केले आहे.पुढे बोलताना अँड बेदरे म्हणाले संयुक्त समितीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की, हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी सुधारित केले गेले आहे. परंतु त्याची मूलभूत दडपशाही करणारी कलमे तशीच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा: हे विधेयक कोणतीही टीका किंवा सार्वजनिक आंदोलन सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक मानले जाऊ शकते. याचा अर्थ असा की, कोणताही निषेध किंवा विरोधी मत व्यक्त करणे हा गुन्हा ठरू शकतो.
 राजकीय विरोधकांना लक्ष्य: हा कायदा राजकीय विरोधकांना, कार्यकर्त्यांना, लेखकांना आणि सरकारसाठी गैरसोयीचे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 हे विधेयक महाराष्ट्राला हुकूमशाहीकडे घेऊन जाईल अशे प्रतिपादन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.या दडपशाही कायद्याचा बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचा वतीने निषेध करतो.

Back to top button