बीड

माजलगावात डॉ.आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन.

माजलगावात डॉ.आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे
शेजुळ,मोरे,धायजे,रेदासनी,काझी, ताकट,मस्के यांचे आवाहन.
माजलगाव प्रतिनिधी :-महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त माजलगावात सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजता डॉ.आंबेडकर चौक येथे निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या उत्सवात तमाम आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ,श्रीहरी मोरे,नवनाथ धायजे, सुरेंद्र रेदासनी,रियाज काझी,बाळू ताकट यांच्यासह  सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे हे १३५ वे वर्ष आहे.या निमित्ताने माजलगाव शहरात सामाजिक एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सर्व जात,धर्मीय बांधवांच्या वतीने सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त शहरातील डॉ.आंबेडकर चौक,येथे सकाळी ९.४५ वा.निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते पार पाडणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आ.प्रकाश सोळंके भूषवणार आहेत.प्रमुख उपस्थितीत रमेशराव आडसकर,मोहनराव जगताप,दयानंद स्वामी,सहाल चाऊस,कचरु खळगे,विजय साळवे राजेश साळवे असणार आहेत.त्यामुळे सामाजिक समता वृद्धिगत करण्यासाठी दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वा.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे असे आवाहन जयंती अध्यक्ष चंद्रकांत उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासणी,राजेंद्र होके पाटील बाळु ताकट, मुजम्मील पटेल,सचिव एकनाथ मस्के,सहसचिव शरद यादव, कोषाध्यक्ष श्रीहरीना मोरे,कमिटी सदस्य:सुशील डक, शेख बाबा,रियाज काझी राजेश घोडे,लक्ष्मण गायकवाड,सल्लागार:डॉ. सुरेश साबळे,नाना घोडके,सुनील सौंदरमल,डॉ.ज्ञानेश्वर गिलबीले,डॉ. दिनकर मस्के,डॉ.श्रेयश देशपांडे, उमेश मोगरेकर,तुकाराम येवले पद्माकर कांबळे,सुभाष नागलगावकर हरिष यादव, तालेब चाऊस प्रभाकर साळेगावकर,दत्ता कांबळे इद्रीस पाशा यांनी केले आहे.या बैठकीला व्यापारी व मराठा मुस्लिम दलित ओबीसी समाजातील प्रमुख उपस्थित होते.
Back to top button