बीड
प्रकाश भैय्या उजगरे यांच्या संवाद दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद..!

प्रकाश भैय्या उजगरे यांच्या संवाद दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद..!
“वंचित बहुजन आघाडी बहुजनांची ताकद आहे” – प्रकाश उजगरे
बीड प्रतिनिधी :वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते प्रकाश भैय्या उजगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संवाद दौऱ्यास वडवणी तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये होत असलेल्या या दौऱ्यात शेतकरी, कामगार, महिला व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
यावेळी बोलताना प्रकाश उजगरे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी ही जनतेची खरी ताकद आहे, बदलाची दिशा आहे.”
“आवाज तुमचा – लढा आमचा” या घोषणांनी दौऱ्याचे वातावरण उत्साहपूर्ण झाले. ग्रामस्थांनी स्थानिक प्रश्न मोठ्या संख्येने मांडले, तर उजगरे यांनी सर्वांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून त्यावर ठाम लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा पिढीचा सहभाग हा समाजपरिवर्तनासाठी उगवता किरण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. हा संवाद दौरा वडवणी तालुक्यात असाच सुरू राहणार असून पुढील काही दिवसांत अनेक गावांमध्ये पोहोचणार आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष विनोद काकडे, शाम उजगरे, रणजित उजगरे, सुरज उजगरे, सचिन डोंगरे, असीम शेख, ऋषीकेश वाघमारे, महादेव वाघमरे, यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



