नागरिकांचे हाल थांबवा! आयुक्त यशवंत डांगे यांना भाजपाचे निवेदन; केली मोठी मागणी..

नागरिकांचे हाल थांबवा! आयुक्त यशवंत डांगे यांना भाजपाचे निवेदन; केली मोठी मागणी..
अहिल्यानगर । :-गेल्या दोन महिन्यांपासून गांधी मैदान, लक्ष्मी कारंजा, आनंदी बाजार, नालेगाव, रंगार गल्ली, गौरी घुमट इत्यादी भागात पाईपलाईनचे व रस्त्याचे काम फारच संथगतीने काम चालू आहे. या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. महानगरपालिकेने या रस्त्याच्या कामाला गती द्यावी. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले.याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी, मध्यनगर मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, संतोष गांधी, बाळासाहेब खताडे, अशोक गुगळे, सुनील तावरे, बबन आढाव, विशाल गायकवाड, उज्वला भांगे, डॉ.दर्शन करमाळकर आदी उपस्थित होते.
सर्व रस्ते उखडले असून पावसामुळे सर्वत्र चिखलमय व दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.रोज या भागात अपघात होत असून नागरिकांना पायी जाणे, चालणे मुश्किल झाले आहे.बऱ्याच भागात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आलेले आहे.
सर्वत्र खाच खळगे युक्त दलदल मय रस्ते झाले असून या सर्व भागातील दुकाने व व्यवसाय देखील बंद पडलेले आहेत. संबंधित ठेकेदाराचे काम कासवाच्या गतीने चालू आहे.तसेच पिण्याच्या पाण्याचे नागरिकांचे फार हाल होत आहे.तरी ताबडतोब आपण या कामात लक्ष घालून नागरिकांचे हाल थांबवावे


