बीड

आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतांची सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी यशस्वीरीत्या संपन्न

आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतांची सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी यशस्वीरीत्या संपन्न

आष्टी : आष्टी पंचायत समिती येथे दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतमध्ये सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण झाले. अंकेक्षणाचा तालुका स्तरीय जनसुनावणी शनिवार दिनांक १०/०१/२०२६ या दिवशी सकाळी १० ते ०५ यावेळेत कार्यक्रम मोठ्या पारदर्शकतेने पार पडला.
जनसुनावणीचे अध्यक्ष म्हणून अॅड. मा. बाळासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मा. आदिनाथ पडोळे, मजूर प्रतिनिधी संदीप पोटरे तसेच समाजसेवक व पत्रकार समीर शेख हे पॅनल सदस्य म्हणून उपस्थित होते.
या जनसुनावणीत जिल्हा साधन व्यक्ती सुशील थोरात यांनी विविध मुद्यांचे वाचन करून सादरीकरण केले. त्यानंतर

जनसुनावणी पॅनलने प्रत्येक मुद्यावर सखोल चर्चा करून योग्य ते निर्णय नोंदविले.
कार्यक्रमास तालुका साधन बाळासाहेब खाडे, सोमिनाथ जगताप, सर्व ग्रामरोजगार सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, तांत्रिक सहाय्यक तसेच गटविकास अधिकारी मा. बागलाने साहेब यांची उपस्थिती होती.
सामाजिक अंकेक्षणामुळे कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनसहभाग वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Back to top button