ब्रेकिंग

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचे खुले आव्हान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते आणि माजी मंत्री किरीट सोमय्या हे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लागवताना दिसून येत आहे, त्यातच आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप लगावत थेट राजीनाम्याचे आव्हान दिले आहे.

कोरोना काळातही महाविकास सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार सुरूच होता. तसेच मंत्रालय १०० टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द १५ हजार रूपये लूटत होते. सामन्या जनता कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ हे जनतेला लूबाडत होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असून त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींचा टीडीएस परतावा भरण्यासाठी हसन मुश्रीफ यांचा जावाई मतीन यांना कंत्राट दिलं होतं. १ हजार ५०० कोटीचं हे कंत्राट पाच वर्षासाठी दिलं होतं. हे कंत्राट अखेर ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. मतीन यांनी जयोस्तुते कंपनी ८ महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. या कंपनीचा मागील ८ महिन्यापासून काहीच व्यवहार न झाल्यामुळे कंत्राट रद्द करण्यात आला आहे, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

Back to top button