बीड

परळी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ 1 मे रोजी

परळी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ 1 मे रोजी

परळी वैजनाथ:-परळी वैजनाथ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ 1 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.* मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते व पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री रविंद्र मधुसुदन जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड माननीय श्री आनंद लक्ष्मीचंद यावलकर हे भुषवणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परळी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी दिपक रुस्तुमराव बोर्डे व परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड हरीभाऊ व्यंकटराव गुट्टे यांनी केले आहे.
Back to top button