📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी चौंडी येथे धनगर समाजाचा दुग्ध अभिषेक

विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी

चौंडी येथे धनगर समाजाचा दुग्ध अभिषेक

जामखेड प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने अहिल्यादेवींच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून शिवसेना नेत्या ॲड. विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेना पक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्याताई मोटे यांना संधी देऊन धनगर समाजाचा सन्मान करावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी सांगितले की, विद्याताई मोटे यांनी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या उमेदवारीला समाजाचा ठाम पाठिंबा आहे. त्या विधान परिषदेत गेल्यास हा धनगर समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरेल.

दरम्यान, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्य, महिला सक्षमीकरण आणि तळागाळातील संपर्क यामुळे विद्याताई मोटे यांचे नाव संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्याची मागणी अधिक जोर धरत आहे.

Back to top button