📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महाराष्ट्र डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बालाजी जगतकर यांचा परळीत सत्कार

महाराष्ट्र डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बालाजी जगतकर यांचा परळीत सत्कार

परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार बालाजी जगतकर यांचा परळी शहरात पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

बालाजी जगतकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि जनहिताच्या विषयांना सातत्याने प्रसिद्धी देत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीनिमित्त परळी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब पठाण, दत्ता शिवगण, इंजि. शिरीष जगतकर, संजय जगतकर, रावसाहेब जगतकर यांच्यासह अन्य मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी बालाजी जगतकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न, डिजिटल माध्यमांसमोरील आव्हाने आणि जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी जगतकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Back to top button