संपादकीय

पडळकर, खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का?

 

मुंबई | परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यातच हे आंदोलन अधिक चिघळताना दिसून येत आहे. यातच आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष सुद्धा या आंदोलनात उतरली आहे. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिशाभूल करणाऱ्या भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची विनंती केली आहे.

परब म्हणाले की, “भाजपाचे दोन-चार नेते पुढाकार घेऊन कामगारांची माथी भडवकत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी या भूलथापांना बळी पडू नये. एसटीचे कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करुनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित आणि राज्य शासनामध्ये विलनीकरणाची मागणी बघून दिला आहे.

एसटी महामंडळात विलनीकरणाची मागणी १ ते २ दिवसांत पूर्ण होणारी नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये तीन उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडून समितीने १२ आठवड्यांमध्ये अहवाल द्यावा अशाप्रकारचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश एसटी महामंडळाला लागू होतो तसा एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू होतो. आम्ही आदेशाती पूर्तता करुन जीआर काढला, बैठक घेत पालन केले.”

Back to top button