बीड
मुक्ताई पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर!

मुक्ताई पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर!
====================
बीड, प्रतिनिधी- संतश्रेष्ठ मुक्ताई पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवाभावातून शिवसेनेच्या वतीने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख संतोष जाधव यांच्या पुढाकाराने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांपासून संतोष जाधव व त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने मुक्ताई पालखीतील वारकऱ्यांची निस्वार्थ भावनेने सेवा केली जात असून, ही सेवेची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. शिबिरामध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वारकरी सेवेलाच ईश्वरसेवा मानत राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून, अधिकाधिक वारकऱ्यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आणि तालुका प्रमुख संतोष जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



