📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महाशिवरात्री उत्साहात:विंचारणा नदीकाठच्या तपनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्री उत्साहात:विंचारणा नदीकाठच्या तपनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

शिवलिलामृत पारायण सोहळ्याची सांगता

जामखेड प्रतिनिधी:महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरातील विंचारणा नदीकाठी वसलेल्या मूळ तपनेश्वर महादेव मंदिर येथे आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. “हर हर महादेव”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.भाविकांनी पहाटेपासून रांगा लावत भगवान महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी महाभिषेक,बेलपत्र अर्पण आणि विशेष पूजाविधी करण्यात आले. भाविकांनी कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. पंढरीनाथ (महाराज) राजगुरू यांच्या पारायणाने शिवलिलामृत पारायण सोहळ्याची सांगता झाली.सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप विवेकानंद(महाराज)
मंजरतकर यांचे कीर्तन होणार असून भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले.
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघाला. तसेच भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने प्रसादाचे वितरण करण्यात आले असून हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समिती व स्वयंसेवकांनी केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली. महाशिवरात्रीनिमित्त परिसरात दिवसभर उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी नगरसेवक राजेंद्र गोरे, अशोक माने, दत्तात्रय उतेकर, शिवाजी काळदाते, मिठूलाल नवलाखा, गणपत बनगे, भाऊ परदेशी, अविनाश वाघमारे, विकास चव्हाण, मनोज बोळे, साईनाथ जाधव, संतोष माने, लखन क्षिरसागर, विकास परदेशी, अक्षय माने, पुजारी नंदू गुरव, मगन चव्हाण, गोविंद साठे आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button