बीड
महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत व कृष्णा महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने तरडगव्हाण सप्ताहाची सांगता

महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत व कृष्णा महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने तरडगव्हाण सप्ताहाची सांगता
ग्रामस्थांनी जाहीर केलेली देणगी महंत नामदेव महाराज शास्त्रीजींकडे केली सुपूर्द
शिरूर (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे तरडगव्हाण येथील अधिक मास निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी सांगता झाली. सप्ताहाच्या सांगते प्रसंगी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांची मुख्य उपस्थिती होती. संपूर्ण तरडगव्हाण ग्रामस्थांनी श्रीगुरु शास्त्री बाबांचे भव्य दिव्य स्वागत केले. श्रीगुरूंच्या स्वागतासाठी संपूर्ण ग्रामस्थ गावाच्या शिवापर्यंत आडवे आले होते. भव्य व आकर्षक रथामध्ये बसवून ग्रामस्थांनी श्रीगुरुंची मिरवणूक काढली. मिरवणूक प्रसंगी ग्रामस्थांनी टाळ मृदंगासह ढोल लेझीमांच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. सप्ताहाचा प्रारंभ अ.जेष्ठ शु. ३ दि.१९/०५/२०२६ रोजी होऊन सांगता अ. जेष्ठ शु. १० दि.२६/०५/२०२६ रोजी झाली. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहामध्ये कीर्तनकार पुढील प्रमाणे होते : मंगळवार दि.१९/०५/२०२६ श्री.ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (परळी), बुधवार दि.२०/०५/२०२६ श्री.ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील (आळंदी), गुरुवार दि. २१/०५/२०२६, श्री.ह.भ.प. किशोर महाराज सूर्यवंशी (लातूर), शुक्रवार दि. २२/०५/२०२६, श्री.ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर, शनिवार दि. २३/०५/२०२६, श्री.ह.भ.प. भरत महाराज जोगी (परळी), रविवार दि. २४/०५/२०२६, श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर (जळगाव) सोमवार दि. २५/०५/२०२६ श्री.ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक (नागापुर), मंगळवार दि. २६/०५/२०२६ रोजी ह.भ.प.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री (महंत, श्री क्षेत्र भगवानगड) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी, ह.भ.प.श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले. सप्ताहाचे आयोजक ह.भ.प.श्री.वैजिनाथ महाराज शास्त्री व समस्त गावकरी मंडळी, तरडगव्हाण हे होते. काल्याच्या कीर्तनानंतर संपूर्ण भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.



