बीड

रामायणातून जीवनमूल्यांची प्रेरणा – श्रीराम जन्मोत्सवात जामखेड येथे हिंदू मेळावा

रामायणातून जीवनमूल्यांची प्रेरणा – श्रीराम जन्मोत्सवात जामखेड येथे हिंदू मेळावा

“संस्कारच राष्ट्र घडवतात, संपत्ती नाही – संतोष वाळुंजकर यांचे स्पष्ट मत”

जामखेड (प्रतिनिधी) –रामायण हा जीवनाचे आदर्श मूल्य शिकवणारा ग्रंथ आहे. श्रीराम हे आदर्श पिता, पती, पूत्र, भाऊ व राजा होते. त्यांच्या विचारांनी प्रेरित जीवन हेच खरे सार्थक जीवन आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या तरुण पिढीला संपत्तीपेक्षा संस्कारांची गरज आहे. संस्कारांनीच देश घडतो आणि आत्मसन्मान निर्माण होतो.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद माजी सदस्य संतोष वाळुंजकर यांनी केले.

श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व जामखेड प्रखंड तालुक्याच्यावतीने भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे,बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा व संयोजक विवेक कुलकर्णी,प्रमुख वक्ते संतोष वाळुंजकर, विश्व हिंदू परिषद जामखेड प्रखंड मंत्री दिगंबर राळेभात, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक बाळासाहेब दळवी, तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमित चिंतामणी व उद्योगपती आकाशशेठ बाफना यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, भारतीय जनता पार्टीचे डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक पवन राळेभात, संजय (काका) काशिद व इतर अनेक मान्यवर बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार बजरंग दल सह संयोजक यादव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी संतोषशेठ फिरोदिया यांचे विषेश सहकार्य लाभले. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर संचलन वैभव कार्ले यांनी केले.यावेळी जामखेड शहरातील हिंदू बांधव उपस्थित होते.

Back to top button