📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महात्मा गांधी- लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त;सेवा पंधरवड्याचा समारोप

महात्मा गांधी- लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त;सेवा पंधरवड्याचा समारोप

जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रम विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद यांच्या नियोजनातून जामखेड शहरात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर, दिव्यांग व्यक्ती सन्मान, आरोग्य शिबिर,पंडित दीनदयाळ जयंती निमित्त वृक्षारोपण व ओकल फॉर लोकल (स्वदेशी नारा) असे कार्यक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून जेष्ठ नेते प्रवीण चोरडिया,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उद्धवराव हुलगुंडे यांनी काम पाहिले.आज दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद,प्रविण चोरडिया,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, बाजार समितीचे संचालक डॉ.गणेश जगताप,तात्याराम पोकळे,अशोक महारनवर,युवा नेते मोहन देवकाते, सचिन भंडारी,आकाश बाफना,शिवकुमार डोंगरे, अशोक मोरे, अर्जुन म्हेत्रे, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button