
.168 टीएमसी पाण्यासाठी लोकलढ्यात उतरू- मा. आ. धोंडे
लोकलढा समन्वयकांनी साधला संवाद
कोळगाव बाळासाहेब घाडगे-
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कोकणात वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या पाण्यातून बीड जिल्ह्यातील शेतीला हक्काचे पाणी आणणे गरजेचे अआहे, यासाठी सुरू असलेल्या लोकलढा आंदोलनात आपण उतरू असा विश्वासमाजी आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले. लोकलढा आंदोलनाच्या समन्वयकांनी त्यांची श्रीराम संस्थान तिंतरवणी येथे भेट घेत संवाद साधला.
यावेळी महंत बालाजी महाराज शास्त्री, महादेव नागरगोजे पाटील, रामराव नाना खेडकर, बाबुराव मामा जेठे, समन्वयक दिनेश गुळवे, संतोष भारती, राहुल लोंढे, शामराव घुगे, बालासाहेब राऊत सर, सुशील कोळेकर आदी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीला बारमाही पाणी मिळावे, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून लोकलढा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील समन्वयकांनी बुधवारी सायंकाळी माजी आमदार भीमराव धोंडे यांची तिंतरवणी येथे भेट घेऊन संवाद साधला. श्री क्षेत्र भगवान गड पासून मातोरी, तिंतरवणी, चकलांबा, शेकटा, मादळमोही, पाडळसिंगी, पाचेगाव, कुक्कडगाव, सिरसदेवी, तारखेपर्यंतच्या शेतीला जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे यासाठी लोकलढा आंदोलन सुरू आहे. सध्या सरकारकडून मराठवाड्यातील शेतीला पाणी मिळावे यासाठी कोकणात वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पाण्यामधून बीड जिल्ह्यातील शेतीला किती पाणी मिळणार आहे व हे पाणी अग्रगण्यपणे बीड जिल्ह्यातील वंचित भागातील शेतीला मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असून लोकलढा आंदोलनाची माहिती यावेळी धोंडे यांना देण्यात आली. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले. की आष्टीमध्ये पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. आता पाटोदा व शिरूर तालुक्यातील शेतीला पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वच वंचित भागाला जायकवाडी धरणात येणारे पाणी मिळणे गरजेचे आहे. यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत. यासाठी लवकरच मुंबईत जाऊन मंत्री व अधिकारी यांची भेट घेणार आहोत. १६८ टीएमसी मध्ये बीड जिल्ह्यातील शेतीला प्राधान्याने पाणी मिळणे गरजेचे आहे, यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनीच एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही यावेळी धोंडे म्हणाले. शेतकर्यांनी सुरू केलेल्या लोकलढा आंदोलनास आपला पाठिंबा असून या आंदोलनात आपण स्वतः शेतकर्यांसह उतरू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



