बीड

युवा नेते अण्णासाहेब ढवळे यांचा स्तुत्य उपक्रम ; तपनेश्वर शाळेत शालेय साहित्य वाटप

युवा नेते अण्णासाहेब ढवळे यांचा स्तुत्य उपक्रम ; तपनेश्वर शाळेत शालेय साहित्य वाटप

जामखेड प्रतिनिधी – भाजपा नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते अण्णासाहेब ढवळे यांच्या वतीने शहरातील कान्होपात्रानगर येथील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तपनेश्वर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रा. मधुकर राळेभात यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.जाकीर शेख, प्रविण बोलभट, अवधूत पवार, काँग्रेसचे राहुल उगले, विनायक राऊत, सलीम तांबोळी, उमेश माळवदकर, अनिल अडाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापिका जया चौभारे, उपाध्यापिका सुजाता राक्षे, शिक्षक प्रताप पवार, शुभांगी साळुंके, शितल कदम, निता तांबे, रूपाली कांबळे तसेच अंगणवाडी सेविका उषा वारे,शुभांगी अडाले,मदतनीस बायजाबाई पवार आदी विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला,प्रा मधुकर आबांसाठी खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला.सामाजिक बांधिलकीतून घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Back to top button