📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

करिअरच्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : सोमनाथ उगले

करिअरच्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : सोमनाथ उगले

बी.के.शिंदे काॅलेज मध्ये इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जामखेड | प्रतिनिधी :
या कॉलेजच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग कार्य करत आहेत. येथील अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना करियर साठी विविध क्षेत्रातील संधी व त्या संधींचा विद्यार्थ्यांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत,आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मत माजी प्राचार्य सोमनाथ उगले सर यांनी व्यक्त केले.

श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशनच्या बी.के. शिंदे कॉलेजमध्ये मंगळवार , दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी प्राचार्य उगले बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना श्रद्धांजली वाहून झाली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव बाळासाहेब शिंदे, माजी प्राचार्य सोमनाथ उगले,प्राचार्य पंकज शिंदे,वैभव श्रीरामे,अक्षय कुदळे सर,जयराम झेंडे आदी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य पंकज शिंदे म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां साठी कायम प्रयत्नशील असलेले बी के शिंदे कॉलेज त्यासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधेची जोड बी.के. शिंदे कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक प्राचार्य प्रयत्नशील राहून सतत टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शिकून विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतल्यामुळे कॉपीमुक्त भयमुक्त पेपर होणार असून नक्कीच विद्यार्थी पेपर ला यश मिळवतील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ति पंडित व शिवानी लटपटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा.अक्षय कुदळे यांनी मानले.

Back to top button