बीड

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी ! विश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थना !!

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी !
विश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थना !!

ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन !!!

जामखेड प्रतिनिधी – जामखेड – जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगांव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली.

सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचे पठन केले या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली. समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा, यासाठी मौलाना मुक्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली .

नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार ; तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,
प्रकाश सदाफुले, प्रा. लक्ष्मण ढेपे,राष्ट्रवादी काँग्रेसतालुका अध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार,काँग्रेसचे राहुल उगले,अमित जाधव,भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात,मंगेश आजबे,शहाजी राळेभात ; प्रशांत राळेभात,संपत राळेभात, प्रविण उगले,आकाश बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.

रमजान महिना संयम, भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो. या निमित्ताने मुफ्ती अफजल कासमी यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी सर्वधर्मीयांनी परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचे आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला .

सामाजिक, राजकीय ; पत्रकार बांधव आणि प्रशासनिक क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील नागरीकांनी मुस्लिम समाज बांधवांना अलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवुन आले .
ईदगाह मैदान ; खर्डा चौक ; जयहिंद चौक ; मस्जिदी व दर्गा या ठिकाणी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Back to top button