
संतांच्या संगतीत सुखाची प्राप्ती होते:- नवनाथ बाबा
संत हरकूबाबांच्या जन्मभूमीत कीर्तन सप्ताह आरंभ
बीड (प्रतिनिधी) संगती जीवनात अतिशय महत्वाची आहे संगतीचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर दुर्जनाच्या संगतीमध्ये मनुष्याच्या जीवनाचं अहित होतं, परंतु मनुष्याने नेहमीच साधू संतांची सेवा करावी,साधू संतांच्या संगती मध्ये मनुष्याला सुखाची प्राप्ती होते असे अभंग विवेचनामध्ये गुरुवर्य शांतीब्रह्मा नवनाथ बाबा महाराज महंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी भावना व्यक्त केले
संत हरकू बाबा महाराजांची जन्मभूमी असलेल्या अंथरवन पिंपरी येथे हरकूबाबा देवस्थान येथे नवनाथ बाबा महंत हरकुबाबा देवस्थान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले होते येथे पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवा गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे होते
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥
या अभंगाचे विवेचन करताना
गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज पुढे म्हणाले की नामस्मरणाने जीवनातील पापाचा डोंगर नाहीसा होतो नामस्मरणामध्ये वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद ही राम नामाच्या नामस्मरणामध्ये आहे.
मनुष्याने आपल्या जीवन सुखी करण्याकरिता साधुसंतांच्या संगती मध्ये राहावे सज्जनाच्या संगतीत राहावे साधुसंतांची सेवा केल्याने आयुष्याचं कल्याण होते त्यामुळे साधुसंत गुरुजन यांची सेवा नेहमी करावी असे गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी अभंग प्रवेशनामध्ये मार्गदर्शन केले या वेळी हरीकिरतनात टाळकरी माळकरी भजनी मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते



