बीड

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध – अमरसिंह पंडित

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध – अमरसिंह पंडित

=========================================
१६४ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे सन्मानपुर्वक वाटप
====================================

गेवराई, दि. १८ (प्रतिनिधी) ः- गेवराई विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी शिवछत्र परिवार कटिबद्ध आहे. शासकीय योजनांचा दिव्यांग बांधवांना लाभ मिळवुन देण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. धनत्रयोदशीच्या शुभ मुर्हतावर त्यांच्या शुभहस्ते १६४ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मंजुरी पत्राचे सन्मानपुर्वक वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसिलदार संजय सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी नगरसेवर राधेशाम येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्या कार्यालयात वेगळा कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी शिवछत्र परिवाराकडुन जाणिवपुर्वक प्रयत्न होत आहेत. शनिवार दि. १८ ऑक्टोबर रोजी कृष्णाई कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात १६४ दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजुरी पत्राचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते सन्मानपुर्वक वितरण करण्यात आले. यापुर्वी  ४० दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले होते. आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान यावेळी लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार संजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या तर शिवछत्र परिवाराच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा लाभ दिव्यांग बांधव व उपस्थितांनी घेतला.
यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, येणार्‍या काळात गेवराई विधानसभा मतदार संघातील एकही दिव्यांग बांधव शासनाच्या रास्त योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेवु. गेवराई येथील कार्यालयात सुरु केलेल्या दिव्यांग कक्षाची माहिती देवुन कोणत्याही कार्यालयात दिव्यांग बांधवांची आडवणुक होत असल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गेवराई नगर परिषदेच्या वतीने शहरात दिव्यांग बांधवांना दिला जाणारा दिव्यांग निधी अनेक वर्षापासुन थकीत होता, तो हक्काचा निधी वाटप करुन त्यांना न्याय देण्याचे काम आपण केल्याचेही यावेळी अमरसिंह पंडित यांनी सांगितले. महायुती सरकारने दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये घसघसीत वाढ केली असुन आता प्रतिमाह आडीच हजार रुपये मानधन मिळणार असल्याचे सांगतांना अमरसिंह पंडित यांनी महायुती सरकारचे आभार मानले.
कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवछत्र परिवाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा लाभ यावेळी त्यांनी घेतला. बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, संग्राम आहेर, श्रीराम आरगडे, रफीक सौदागर, बाबासाहेब चव्हाण, राधाकिसन चक्कर, महेश ढेरे, बाबासाहेब खोसे, दादासाहेब घोडके, सुभाष गुंजाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button