बीड

आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे वनमंत्री गणेश नाईक प्रत्यक्ष हस्तक्षेप; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळाली शासकीय आर्थिक मदत

आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे वनमंत्री गणेश नाईक प्रत्यक्ष हस्तक्षेप; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळाली शासकीय आर्थिक मदत

बीड – आष्टी तालुक्यातील बावी येथे घटलेली दुर्दैवी घटनेमध्ये तरुण शेतकरी स्व. राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३९) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, त्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी वनविभागाकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत मिळून दिली.
या हृदयद्रावक घटनेनंतर आमदार सुरेश धस यांनी तत्काळ वन विभाग व प्रशासनाशी संपर्क साधला आणि निधीअभावी निर्माण झालेल्या अडचणीवर लक्ष केंद्रित करून मा. वनमंत्री श्री. गणेश नाईक साहेबांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे कुटुंबासाठी तातडीची मदत मंजूर करण्यात आली.
— -यामुळे स्व. राजेंद्र गोल्हार यांच्या पत्नी सौ. कौशल्या गर्जे यांना १० लाख रुपयांची तातडीची मदत सुपूर्त करण्यात आली असून, उर्वरित १५ लाख रुपयांची मुदत ठेव रक्कम दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला गंभीर संकटात थोडासा आधार मिळाला आहे. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारामुळे कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आणि प्रशासनिक प्रक्रिया त्वरीत पार पडली.
या प्रसंगी विभागीय वन अधिकारी गर्कळ साहेब, वनपरीक्षेत्र अधिकारी मुंडे, मा. सभापती लक्ष्मण ननवरे, बाबू गर्जे,पोपट गर्जे,धनंजय तरटे, अक्षय लटपटे व सरपंच,उपसरपंच,स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button