📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सतर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सतर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
माजलगाव (प्रतिनिधी):-बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सतर्फे दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा यावर्षीही जोपासली जाणार आहे. “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” या पुरस्कारासाठी सहोदया सदस्य असलेल्या सीबीएसई शाळांमधील गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली असून एकूण २७ शिक्षकांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेमध्ये शैक्षणिक उन्नतीसाठी योगदान दिलेले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची कामगिरी बजावली आहे. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शिस्तबद्धता, समाजाभिमुख कार्य आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अशा शिक्षकांचा गौरव हा पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ चे मानकरी पुढील प्रमाणे आहेत: श्रीमती. विजीथा वि जि (अनिशा ग्लोबल स्कूल आष्टी) , सौ. कविता बाबर (भारती बांगर इंटरनॅशनल स्कुल गेवराई), श्री. नयूम शेख (भेल सेकंडरी स्कुल परळी), श्री.अमोल सांजेकर (कॅनवास इंटरनॅशनल स्कुल कळंब), श्रीमती. हर्षदा सोनावणे (छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुल जोगाईवाडी), श्री. किरण देशमुख (दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल परळी), श्री.इरफान जाफर बावज़ीर (ज्ञानेश्वर पब्लिक स्कुल बीड), श्रीमती. कल्पना इंगोले (इगलवूड इंग्लिश स्कुल माजलगाव), श्रीमती.आशा कुटे (गुरुकुल इंग्लिश स्कुल बीड), श्रीमती. लुईड्स फर्नांडिस (गुरुकुल पब्लिक स्कुल बीड), श्री. बसवराज मन्याळीकर (एम आय टी श्री सरस्वती पब्लिक स्कुल अंबाजोगाई), श्री.पांडुरंग गाडे (महावीर इंग्लिश स्कुल कडा) , श्री. अमित काळे (नारायना इ-टेक्नो स्कुल बीड), श्री. प्रिंसिड चेरुवोडेन (न्यू व्हिजन पब्लिक स्कुल अंबाजोगाई), श्रीमती. जागृती चव्हाण (पोदार इंटरनॅशनल स्कुल अंबाजोगाई), श्रीमती. मनीषा काकडे (पोदार इंटरनॅशनल स्कुल बीड), श्रीमती.अर्चना टेके (आर के पब्लिक स्कुल गेवराई), श्री.सीताराम कराड (राजस्थानीज पोदार लर्न स्कुल परळी), श्री.राजेंद्र निशिगंध (शारदा इंग्लिश स्कुल केज), श्री.सुरज भोजने (शारदा इंग्लिश स्कुल डिकसळ कळंब), श्री.सचिन डोंगरे (शिव शारदा पब्लिक स्कुल गेवराई), श्री. जीबी ऑगस्टन (सिंदफणा पब्लिक स्कुल माजलगाव), श्री.कर्मवीर औताडे (सिनर्जी नॅशनल स्कुल अंबाजोगाई), श्रीमती.वर्षा कोरडे (केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कुल गेवराई), श्री.कमलेश गोरजिले (व्हिजन पब्लिक स्कुल सोनपेठ), श्री.वैजनाथ तेलंग (यश इंटरनॅशनल स्कुल दिंद्रुड), श्रीमती.मॅरी मॅथ्यू (ट्वीनकलिंग स्टार स्कुल बीड)
हा भव्य सन्मान सोहळा शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी, ईगलवुड इंग्लिश स्कूल, माजलगाव येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि विशेष पारितोषिक प्रदान करून त्यांचा सत्कार होईल. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला सुद्धा या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षणप्रेमी तसेच सर्व सदस्य शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
चौकट:
बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सतर्फे दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार शिक्षकांना प्रोत्साहन देणारा ठरत असून त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन दर्जेदार शिक्षणाची प्रेरणा मिळते. समाज घडविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाचे मोल अधोरेखित करणे हा या पुरस्काराचा मुख्य हेतू आहे. – श्री. शितल सर्वज्ञ ( सचिव, बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्स तथा प्राचार्य, गुरुकुल इंग्लिश स्कूल, बीड)

Back to top button