संपादकीय

…आता मालिकांच्या दाव्यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी साधला निशाना

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी मागील काही दिवसात हायड्रोजन बॉम्ब अर्थात गुप्त पुरावे पत्रकार परिषद घेऊन सादर केले होते तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक जोरदार टीका केली आहे

भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव येथे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब हा फुसका बार असल्याचे वक्तव्य केले आहे. नवाब मलिक यांची गुंडी अडकल्यामुळे ते असे आरोप करीत आहेत, पण त्यांनी राजकीय विरोध म्हणून आरोप करण्यापेक्षा सबळ पुरावे द्यायला हवेत, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक राज्यात खळबळ माजवणारे आरोप करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी आरोपांचा धडका लावला आहे. राज्यात मलिकांच्या आरोपांनी खळबळ माजवली आहे. भाजप नेत्यांकडून मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिली जात आहेत.

नुकताच राष्ट्रवादी पक्षात चोपडा तालुक्यातील सेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातूनच सबळ नेतृत्व अभावी चोपडा तालुक्यातील दोनशे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

Back to top button