संपादकीय

‘थापाडे सरकार.! ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा

 

राज्य परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागच्या २ आठवडयासपून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. काळ पासून ते मुंबईत तळ थकून बसले असून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधत टीका केली आहे. ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा असे ट्वीट करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून टोला लगावला आहे आता या टीकेला महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button