मुंबई

आगीपासून वाचण्यासाठी १९ व्य मजल्यावरून उडी घेणाऱ्या त्या व्यक्तीने प्राण गमावले

 

लालगग मुंबईत येथील सर्वात उंच इमारतीमध्ये आग लागली आहे. सदर आग लालबाग परिसरात एका उंच इमारतीला आग लागली आहे. अविघ्न पार्क इमारत असं या इमारतीचं नाव आहे. सध्या आज विझवण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशामक केंद्रातून गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी एका व्यक्तीने जीव वाचवण्यासाठी १९ व्य मजल्यावरून उडी मारली होती.

१९ व्या मजल्यावर एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना या प्रयत्नात ती व्यक्ती खाली कोसळली असून आपला प्राण गमावला आहे. अरुण तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं वय ३० वर्षे होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

लालगब मधील अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमधील १९ व्या मजल्याला ही आग लागली आहे. सकाळी ११.५१ च्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून लेव्हल ३ ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आगीचे गांभीर्य वाढल्याने ही आग लेव्हल ४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच उंचावर वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आग भडकत असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीलमधील रहिवासी आटापिटा करत होते.

Back to top button