राजकिशोर मोदी यांनी प्रभाग १ व प्रभाग २ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत प्रचाराचा केला श्रीगणेशा

राजकिशोर मोदी यांनी प्रभाग १ व प्रभाग २ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत प्रचाराचा केला श्रीगणेशा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-बालाजी देशमुख अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये दिवसेंदिवस निवडणूकित रंग भरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. याच अंबाजोगाई नगर परिषदेच्या रणधुमाळीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार राजकिशोर मोदी यांनी त्या त्या प्रभागातील आपल्या सहकारी उमेदवारांना घेऊन प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. गुरुवार दि १३ रोजी प्रभाग क्रमांक १ मधून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचाराचा शुभारंभ केला. शुक्रवार दि १४ रोजी प्रभाग क्रमांक २ मधील सर्व मतदारांना सहकार्य करण्याची व मतदान रुपी आशिर्वाद देण्याची साद राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकारी उमेदवारांनी दिली. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक १ मधील प्रमुख उमेदवार संकेत राजकिशोर मोदी व हाजी शेख व त्या प्रभागातील अनेक सहकारी उपस्थित होते. तर प्रभाग क्रमांक २ मध्ये तेथील प्रमुख उमेदवार अंकुश हेडे व मणियार व त्या प्रभागातील प्रमुख सहकारी हे सहभागी होते.
प्रभागातील या भेटीदरम्यान राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मतदारांच्या कडून उत्स्फूर्तपणे स्वागत केल्या जात होते. त्याचबरोबर जागोजागी सुवासिनींकडून औक्षण देखील केल्या जात होते. यावरून राजकिशोर मोदी यांच्या प्रति मतदारांचा विश्वास व प्रेम दिसून येत होते. अंबाजोगाई शहर हे मोदी कुटुंबाला मानणारे शहर आहे. त्याच्याच सहकार्य व आशीर्वादाने राजकिशोर मोदी हे मागील अनेक वर्षे अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून शहर वासीयांची सेवा करत आहेत. आपल्या पित्याच्या समाजसेवेचा राजकीय वसा पुढे चालवण्यासाठी त्यांचे सुपुत्र संकेत मोदी हे त्यांच्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक लढवीत आहेत. संकेत मोदी हे शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत आपला सक्रिय सहभाग घेऊन त्यातून त्यांनी युवकांची एक नवीन फळी तयार केली आहे. संकेत मोदी यांनी गणेशोत्सव काळात अंबाजोगाई शहरातील गणेश मंडळाच्या ढोलताशा वाद्य स्पर्धा घेऊन अंबाजोगाई चे ढोल पथक साऱ्या महाराष्ट्र भर पोचवले आहे. त्याचबरोबर नवरात्र उत्सवात दांडिया स्पर्धेची उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजित करून येथील महिला, युवक व युवतींना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून संकेत मोदी हे अंबाजोगाई शहरातील घराघरात पोचले आहेत.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान राजकिशोर मोदी हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावरच यापुढेही मतदान रुपी आशिर्वाद मागत आहेत. अंबाजोगाई शहर हे एक कुटुंब म्हणून आपण काम केले असून येथील नागरिकांनी देखील भक्कम अशी साथ दिली आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना पाठबळ देण्याचे आवाहन या प्रचारादरम्यान राजकिशोर मोदी मतदारांना करत आहेत. मतदार देखील खंबीरपणे मोदी कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन देतांना दिसून येत आहेत. शहरातील मतदार नवयुवक, महिला व जेष्ठ नागरिक यांच्या कडून मिळत असलेले प्रेम पाहून मोदी व त्यांचे सहकारी भारावून जात आहेत व त्यांच्यात पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा संचारत असल्याची भावना निर्माण होत आहे.



