राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपाचा नेत्रदीपक विजय;आष्टी मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपाचा नेत्रदीपक विजय;आष्टी मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
आष्टी (प्रतिनिधी)
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने २९ पैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये दणदणीत व नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या ऐतिहासिक यशामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण असून, आष्टी शहरातही भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा करत हा विजय साजरा केला.
या विजयामागे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि मजबूत संघटनात्मक बांधणीचा मोलाचा वाटा असल्याचे सर्वत्र मानले जात आहे. प्रभावी नियोजन, संघटनशक्ती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख धोरणांमुळे जनतेने भाजपावर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेश धस यांनी सांगितले की, “राज्यातील मुंबई सह २९ पैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये मिळालेला हा विजय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वाच्या स्पष्ट दिशेचा परिणाम आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने विकास, पारदर्शकता आणि सुशासनाचा जो विश्वास जनतेमध्ये निर्माण केला, त्यालाच हा कौल आहे. हा विजय कोणत्याही एका शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील जनतेने भाजपाच्या धोरणांना दिलेली मान्यता आहे.”
या यशामुळे आगामी काळात राज्यातील शहरी विकास, पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि सुशासन यांना अधिक गती मिळेल, असा विश्वास भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



