📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

पहलगाम हल्ल्याचा निषेध करीत चिपळूण मधील सकल हिंदू समाज बांधवांच्या मोर्चाने चिपळूण शहर दणाणले

पहलगाम हल्ल्याचा निषेध करीत चिपळूण मधील सकल हिंदू समाज बांधवांच्या मोर्चाने चिपळूण शहर दणाणले
चिपळूण:- जम्मू-काश्मीर पहेलगाम येथे हिंदू पर्यटकांचे जिहादी आतंकवाद्यांनी केलेले हत्याकांड आणि पश्‍चिम बंगाल येथे जिहादींनी हिंदुवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाज चिपळूण तर्फे चिपळूण शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी चिपळूण शहर दणाणून गेले.
दि.२२ एप्रिल रोजी कश्मीर पहलगाम येते विविध भागातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून २७ निष्पाप पर्यटकांची हत्या केली गेली. या विरोधात सगळीकडेच संतापाची लाट उसळली अनेकांनी या घटनेचा निषेध केला गेला चिपळूण शहरात आज सायंकाळी मोर्च काढून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मोर्चला शहरातील वेस मारुती मंदिर पासून सुरुवात झाली
हा मोर्चा चिंचनाका,बाजारपेठ मार्ग ,खाटीक गल्ली मार्ग पुन्हा चिंचनाक्याकडून एस टी एसटी स्टँड कडून पोलीस स्टेशन पोलीस स्थानक येते निवेदन देण्यात आले .पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा ,हिंदू का विश्वास है सर्व धर्मसमभाव है या घोषणांनी चिपळूण परीसर दणाणून गेला .या मोर्चात आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे,उमेश सकपाळ,भाजपा तालुका अध्यक्ष विनोद भुरण,शहर अध्यक्ष शशिकांत मोदी,अमित जोशी,सुरेश शिंदे,दिपा देवळेकर,उदय ओतारी, परिमल भोसले,निहार कोवळे,दीपा देवळेकर,प्रणय वाडकर,रामदास राणे,विजय चितळे,विनोद बोभसकर,सुनील गोरीवले ,उदय चितळे,विश्वास चितळे,बाबू पिसे, विजय रतावा, देववृत्त तांबे,सुरेश पवार,प्रकाश पवार आदींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Back to top button